सोलापूर - महापालिका निवडणुकीमधून ओबीसी समाज हद्दपार
सोलापूर, 08 जानेवारी (हिं.स.)। पुरोगामित्वाचा बुरखा पांघरलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाला नगण्य स्थान दिले आहे. भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी मिळून ओबीसी समाजाला निवडणुकीतून हद्दपार केले आहे, असा गंभीर आरोप ओबीसी ने
smc


सोलापूर, 08 जानेवारी (हिं.स.)। पुरोगामित्वाचा बुरखा पांघरलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाला नगण्य स्थान दिले आहे. भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी मिळून ओबीसी समाजाला निवडणुकीतून हद्दपार केले आहे, असा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज केला.हाके पंढरपुरात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ओबीसी समाजाची राजकीय पक्षांनी भ्रूणहत्या केल्याचेही सांगितले.

हाके म्हणाले की, ओबीसीचे नेतृत्व तयार होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसीसाठी आरक्षण ठेवले. पण ओबीसींच्या नेतृत्वाची भ्रूणहत्या या निवडणुकांमध्ये झाली आहे.भाजपच्या खांद्यावर विश्वासाने ओबीसीने मान ठेवली. परंतु त्यांनीसुद्धा पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये ओबीसीचे नेतृत्व संपविले आहे. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये योग्य तो धडा त्यांना शिकवला जाईल, असा इशारा हाके यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande