सुशीलकुमार शिंदेंचा सोलापूर महापालिका निवडणुकीत उमेदवारासाठी थेट प्रचार
सोलापूर, 08 जानेवारी (हिं.स.)। सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी थेट प्रचाराच्या मैदानात उतरत पुन्हा एकदा आपली राजकीय सक्रियता दाखवून दिली आहे. वयाच्या 84 व्या वर्षीही कार्यकर्त्यांसाठी आणि पक
सुशीलकुमार शिंदेंचा सोलापूर महापालिका निवडणुकीत उमेदवारासाठी थेट प्रचार


सोलापूर, 08 जानेवारी (हिं.स.)।

सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी थेट प्रचाराच्या मैदानात उतरत पुन्हा एकदा आपली राजकीय सक्रियता दाखवून दिली आहे. वयाच्या 84 व्या वर्षीही कार्यकर्त्यांसाठी आणि पक्षाच्या भूमिकेसाठी रस्त्यावर उतरलेले शिंदे पाहून सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवाराच्या प्रचारासाठी शिंदेंनी स्वतः उपस्थित राहत पदयात्रेत सहभाग घेतल्याने प्रचाराला वेगळीच धार मिळाल्याचे चित्र दिसून आले.

सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 मधून काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस रॉकी बंगाळे यांच्या मातोश्री मंगला बंगाळे या निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसच्या पाठिंब्याने त्या अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या असून त्यांच्या प्रचारासाठी सुशीलकुमार शिंदे यांनी थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. प्रभाग क्रमांक 6 मध्ये काढण्यात आलेल्या पदयात्रेत शिंदेंनी सहभाग घेत मतदारांशी थेट संवाद साधला. त्यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून अनेकांनी शिंदेंशी संवाद साधत आपली मते आणि अपेक्षा मांडल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande