गोपाळ समाजाचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा - पालकमंत्री संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर, 08 जानेवारी (हिं.स.)। गोपाळ समाजाचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा असल्याचे शिवसेेना नेते तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. गोपाळ समाजाने शिवसेनेवर आपला ठाम विश्वास व्यक्त करत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला
गोपाळ समाजाचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा!


छत्रपती संभाजीनगर, 08 जानेवारी (हिं.स.)।

गोपाळ समाजाचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा असल्याचे शिवसेेना नेते तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. गोपाळ समाजाने शिवसेनेवर आपला ठाम विश्वास व्यक्त करत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला. हा पाठिंबा म्हणजे केवळ समर्थन नाही, तर विकास, नेतृत्व आणि जनहिताच्या कार्यावर दाखवलेला ठोस विश्वास आहे.

गोपाळ समाजाकडून मिळालेल्या या बळामुळे शिवसेनेची ताकद अधिक मजबूत झाली असून, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत विजयाचा विश्वास अधिकच दृढ झाला आहे.

जनतेचा वाढता प्रतिसाद आणि विविध समाजघटकांचा पाठिंबा पाहता, शिवसेनेचा विजयाचा ट्रेंड दिवसेंदिवस अधिक वेग घेत आहे.

एकजूट, विश्वास आणि विकासाच्या जोरावर शिवसेना निश्चितच यशाचा भगवा फडकवणार असा आशीर्वाद पालकमंत्री शिरसाट यांनी व्यक्त केला

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande