पुण्यात शिवसेनेच्या प्रचारादरम्यान राडा
पुणे, 08 जानेवारी (हिं.स.)। महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यात राजकीय तणाव वाढला असून, हडपसर परिसरातील काळेपडळ येथे एका प्रचाराच्या मोहिमेला हिंसक वळण लागले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या त
पुण्यात शिवसेनेच्या प्रचारादरम्यान राडा


पुणे, 08 जानेवारी (हिं.स.)। महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यात राजकीय तणाव वाढला असून, हडपसर परिसरातील काळेपडळ येथे एका प्रचाराच्या मोहिमेला हिंसक वळण लागले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी हल्ला चढवला. या घटनेत भानगिरे यांच्या वाहनाचं नुकसान झालं असून, महिला उमेदवार सारिका पवार यादेखील जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाना भानगिरे आणि प्रभाग क्रमांक ४१ च्या उमेदवार सारिका पवार हे आपल्या कार्यकर्त्यांसह हडपसरमधील काळेपडळ येथील मयूर जेएमएनएस सोसायटी परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक काही समाजकंटकांनी त्यांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. या हल्ल्यात भानगिरे यांच्या कारची काच फुटली, तर एक दगड लागल्याने उमेदवार सारिका पवार यांच्या हाताला दुखापत झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande