सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - अमित शाह
पाटणा, 26 फेब्रुवारी (हिं.स.)। सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीमांचलमधील घुसखोरीच्या प्रश्नावर कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले.ते बिहारमधील अररिया येथे
सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल- अमित शाह


पाटणा, 26 फेब्रुवारी (हिं.स.)। सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीमांचलमधील घुसखोरीच्या प्रश्नावर कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले.ते बिहारमधील अररिया येथे एसएसबीच्या जवानांना संबोधित करताना बोलत होते. त्यांनी सांगितले की घुसखोरीमुळे या भागाच्या लोकसंख्यात्मक रचनेत बदल झाला असून तो कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही.

जवानांना संबोधित करताना त्यांनी सीमा सुरक्षा मजबूत ठेवण्याबरोबरच अवैध तस्करी, अमली पदार्थांची तस्करी (नार्कोटिक्स) आणि इतर गुन्हेगारी कारवायांवर कडक नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या. यासाठी स्पष्ट एसओपी (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर) तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली, जेणेकरून खालच्या स्तरापर्यंत तैनात असलेले जवान पूर्णपणे सतर्क राहतील. खुल्या सीमांची सुरक्षा ही मोठे आव्हान असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अमित शाह म्हणाले की बिहारच्या जनतेशी निवडणुकीदरम्यान घुसखोरांना बाहेर काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते आणि ते केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नव्हते. प्रत्येक घुसखोराची ओळख पटवून त्याला भारताच्या भूमीतून बाहेर केले जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. सीमांचल भागात या संदर्भातील कारवाई लवकरच सुरू होणार आहे.

यापूर्वी अमित शाह यांनी किशनगंज जिल्ह्यातील पूर्व पाली येथील हनुमान मंदिरात पूजा-अर्चना केली. या वेळी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी देखील त्यांच्या सोबत उपस्थित होते.

आज , गुरुवारी अमित शाह केंद्रीय मंत्री माछमारा हवाई पट्टीवरून सीमा सुरक्षा दलाच्या हेलिकॉप्टरने अररिया येथे रवाना होणार आहेत. अररिया येथील सुमारे सहा तासांच्या दौऱ्यात ते सीमा चौक्यांचे निरीक्षण करणार, नव्याने उभारलेल्या इमारतींचे उद्घाटन करणार तसेच सीमावर्ती जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande