मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी अनिल अंबानी ईडीसमोर हजर
नवी दिल्ली, २६ फेब्रुवारी (हिं.स.)उद्योगपती आणि रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी गुरुवारी एका कथित बँक फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दुसऱ्या फेरीच्या चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालया (ईडी)समोर हजर झाले. अनिल अंबानी सकाळी १०:३० वाजता
अनिल अंबानी मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीसमोर हजर


नवी दिल्ली, २६ फेब्रुवारी (हिं.स.)उद्योगपती आणि रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी गुरुवारी एका कथित बँक फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दुसऱ्या फेरीच्या चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालया (ईडी)समोर हजर झाले.

अनिल अंबानी सकाळी १०:३० वाजता मध्य दिल्लीतील केंद्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयात पोहोचले. परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) अंतर्गत चौकशीच्या संदर्भात ईडीने त्यांना नवी दिल्लीतील मुख्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. त्यांची शेवटची चौकशी ऑगस्ट २०२५ मध्ये झाली होती. तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की अनिल अंबानी यांचे जबाब मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ च्या तरतुदींनुसार नोंदवले जातील. ही चौकशी त्यांच्या समूह कंपनी, रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) येथे ४०,००० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या कथित बँक कर्ज फसवणुकीच्या प्रकरणाशी संबंधित आहे.

अंबानी आणि त्यांच्या समूहातील विविध कंपन्यांवर कर्ज फसवणुकीचा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अलीकडेच या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. बँक कर्ज फसवणूक आणि इतर आर्थिक अनियमिततांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी अनिल धीरूभाई अंबानी ग्रुप (एडीएजी) विरुद्ध मनी लाँड्रिंगचे तीन खटले दाखल केले आहेत, अशी माहिती ईडीने सर्वोच्च न्यायालयाला दिली.

एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी, ईडीने मनी लाँड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत अनिल अंबानी यांचे मुंबईतील निवासस्थान 'अॅबोड' तात्पुरते ताब्यात घेतले. त्याची किंमत ३,७१६ कोटी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande