अलिबाग बुरूड समाज अध्यक्षपदी अजय करंबत; उपाध्यक्षपदी कल्पेश महाले
रायगड, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।अलिबाग तालुका व रायगड जिल्हा बुरूड समाजाची प्रतिष्ठित कार्यकारिणी निवड सभा अलिबाग तालुक्यातील नागाव येथील बुरूड समाज मंदिरात उत्साहात पार पडली. सभेदरम्यान अलिबाग तालुका बुरूड समाजाच्या अध्यक्षपदी अजय करंबत (रा. अलिबाग
Ajay Karambat as Alibaug Burud Samaj President; Kalpesh Mahale as Vice President


रायगड, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।अलिबाग तालुका व रायगड जिल्हा बुरूड समाजाची प्रतिष्ठित कार्यकारिणी निवड सभा अलिबाग तालुक्यातील नागाव येथील बुरूड समाज मंदिरात उत्साहात पार पडली. सभेदरम्यान अलिबाग तालुका बुरूड समाजाच्या अध्यक्षपदी अजय करंबत (रा. अलिबाग) यांची, तर उपाध्यक्षपदी कल्पेश महाले (रा. अलिबाग) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

तसेच रायगड जिल्हा बुरूड समाजाच्या अध्यक्षपदी जितेंद्र महाले (रा. पनवेल) यांची, तर उपाध्यक्षपदी कुनाल गायकवाड (रा. उरण) यांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. समाजकार्यातील दीर्घ अनुभव, संघटन कौशल्य आणि समाजहिताची बांधिलकी लक्षात घेऊन या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सभा शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. समाजाच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande