माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचा वाढदिवस साजरा!
अकोला, 26 फेब्रुवारी (हिं.स.) संघटन कौशल्य अजातशत्रू तसेच समाजातील प्रत्येक घटकाशी एकरूप होऊन त्यांचा भावना जाणून घेणारे शेतकरी नेते संस्कारशील आणि पक्ष विस्तारासाठी सातत्याने काम करणारे माजी खासदार संजय भाऊ धोत्रे यांचा ६७ वाढदिवस सेवा समर्पण म्ह
Photo


अकोला, 26 फेब्रुवारी (हिं.स.)

संघटन कौशल्य अजातशत्रू तसेच समाजातील प्रत्येक घटकाशी एकरूप होऊन त्यांचा भावना जाणून घेणारे शेतकरी नेते संस्कारशील आणि पक्ष विस्तारासाठी सातत्याने काम करणारे माजी खासदार संजय भाऊ धोत्रे यांचा ६७ वाढदिवस सेवा समर्पण म्हणून आज जिल्ह्यात 422 ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला अन्नदान, अभिषेक दुग्ध अभिषेक, आरोग्य शिबिर, स्वच्छता अभियान, फळ वाटप, विविध समाजातील कार्यरत कार्यकर्त्यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्यात आला.

अकोला जिल्हा आणि महानगर यामधील 23 मंडळांमध्ये विविध आघाडी विविध कार्यकर्त्यांनी बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख यांनी जिल्हा आणि महानगरामध्ये पालकमंत्री ऍडव्होकेट आकाश फुंडकर विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे आमदार प्रकाश भारसाकडे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल किशोर पाटील आदींच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रम करण्यात आले.

अकोला जिल्हा ग्रामीण आ मा.खासदार संजय भाऊ धोत्रे माजी केंद्रीय मंत्री यांचे वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील सतरा ही मंडळामध्ये साजरा करण्यात आला एक हजार 524 पदाधिकारी,लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी यामध्ये भाग घेतला तर अकोला महानगरात 942 कार्यकर्त्यांनी सहकार्य सहभाग घेतला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande