रत्नागिरी : मालगुंड येथे शुक्रवारी मराठी भाषा गौरव दिन
रत्नागिरी, 26 फेब्रुवारी, (हिं. स.) : मालगुंड (ता. रत्नागिरी) येथे कवी केशवसुत स्मारकात शुक्रवारी, दि. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा
मराठी भाषा गौरव दिन


रत्नागिरी, 26 फेब्रुवारी, (हिं. स.) : मालगुंड (ता. रत्नागिरी) येथे कवी केशवसुत स्मारकात शुक्रवारी, दि. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे.

कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधून मराठी भाषा विभाग, मराठी भाषा समिती जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने कवी केशवसुत स्मारकात दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास जिल्हाधिकारी मनुज जिंदल, उपजिल्हाधिकारी व मराठी भाषा समिती अध्यक्ष विश्वजित गाताडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, रत्नागिरी जिल्हा कोमसापचे अध्यक्ष आनंद शेलार, कोमसापचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे उपस्थित राहणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande