
नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी (हिं.स.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महान क्रांतिकारक वीर सावरकरजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन केले.
या स्वातंत्र्यसैनिकाचा गौरव करताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी देशाला गुलामीच्या शृंखलांतून मुक्त करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, वीर सावरकरजींचे व्यक्तिमत्व आणि कार्य राष्ट्रसेवेसाठी प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी