लातूरात १०.३० लाखांचा प्रतिबंधित गुटखा व कार जप्त
लातूर, 26 फेब्रुवारी (हिं.स.)। जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा ठोस कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. उदगीर ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत नाईक चौक परिसर
पोलिसांची कारवाई


लातूर, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।

जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा ठोस कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. उदगीर ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत नाईक चौक परिसरात संशयित चारचाकी अडवून सुमारे १० लाख ३० हजार ८०० रुपयांचा गुटखा आणि वाहन जप्त केले. पोलिसांना त्यांच्या हद्दीतून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी विशेष पथकाला दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार संशयित वाहनांचा शोध घेत असताना नाईक चौक परिसरात एक इटिऑस कार संशयास्पद हालचाली करताना दिसली. पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा दिल्यानंतर चालकाने आदेश धुडकावून लावत वाहन थेट पोलिसांच्या दिशेने चालवण्याचा प्रयत्न केला. काही काळ तणावपूर्ण पाठलाग

सुरू राहिला. अखेर नागलगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी वाहन अडवून चालकाला ताब्यात घेतले.

तपासणीदरम्यान वाहनात मोठ्या प्रमाणात विमल नावाचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. या प्रकरणी आखीब मुसाभाई मिर्झा (वय २७, रा. मदिना नगर, उदगीर) याला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत हा माल नळेगाव येथील फिरोज पटवेकर यांच्याकडे आर्थिक फायद्यासाठी पोहोचवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. कारवाईत सुमारे २ लाख ८० हजार ८०० रुपयांचा गुटखा आणि साडेसात लाख रुपये किमतीची टोयोटा इटिऑस (१२ ९७८०) अशी एकूण १० लाख ३० हजार ८०० रुपयांची

मालमत्ता जप्त करण्यात आली. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९३/२०२६ नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता () कलम १२३, २७४, २७५, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम ५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रायपाल्ले करीत असून, या अवैध गुटखा पुरवठा साखळीतील इतर संबंधितांचा शोध सुरू आहे. लातूर जिल्हा पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या आणि शासनाने प्रतिबंधित केलेल्या पदार्थांच्या व्यवहारावर कठोर कारवाई कायम ठेवली जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande