स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या - आ. प्रसाद लाड
* प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन ! मुंबई, 26 फेब्रुवारी (हिं.स.) – ‘आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा. राज्याच्या संसदीय कार्यमंत्
प्रसाद लाड विधान परिषद


* प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन !

मुंबई, 26 फेब्रुवारी (हिं.स.) – ‘आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा. राज्याच्या संसदीय कार्यमंत्र्यांनी तसा प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठवावा आणि सभापतींनी हा ठराव एकमताने संमत करून घ्यावा’, अशी मागणी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत केली.

या मागणीवर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ते म्हणाले, ‘‘शासनाला असा प्रस्ताव आणावा लागेल. मी या परिषदेत असा प्रस्ताव मांडतो आणि त्यानंतर सभापती महोदयांनी त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा.’’ यामुळे महाराष्ट्र विधीमंडळातून सावरकरांच्या ‘भारतरत्न’ पुरस्काराविषयीच्या कार्यवाहीला आता खर्‍या अर्थाने प्रारंभ झाला आहे.

हिंदुत्वनिष्ठ सरकारकडून जनतेला अपेक्षा !

गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून केंद्रात आणि राज्यातही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्वनिष्ठ विचारांवर चालणारे सरकार सत्तेत आहे. असे असूनही अद्याप विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळालेला नाही. याविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून वारंवार खंत व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकोत्सवी कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही या विषयावर भाष्य केले होते. आता विधान परिषदेत ही मागणी झाल्याने सावरकरप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande