राहुल गांधींच्या निषेधार्थ लातूरमध्ये आंदोलन
लातूर, 26 फेब्रुवारी (हिं.स.)। नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) शिखर परिषदेदरम्यान विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेत नरेंद्र मोदी भारताची भूमिका मांडत असताना, राहुल गांधी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी
निदर्शनं


लातूर, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।

नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) शिखर परिषदेदरम्यान विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेत नरेंद्र मोदी भारताची भूमिका मांडत असताना, राहुल गांधी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन केल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

या प्रकारामुळे देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करत, शिवसेना व काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये युवासेना व शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला तसेच प्रतीकात्मक पुतळा दहन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.

लातूर जिल्हा युवासेना व शिवसेना यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात युवासेना जिल्हाध्यक्ष कुलदीप सूर्यवंशी, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष बालाजी गोडसे पाटील, रेनापूर शहराध्यक्ष रवी चव्हाण, विधानसभा संघटक सतीश करंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande