पुण्यात महापौरांचा हेडगेवारांना हार, शाहू महाराजांना केवळ नमस्कार?
पुणे, 26 फेब्रुवारी (हिं.स.)। पुणे महानगरपालिकाच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिका भवनातील विविध नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले. मात्र डॉ. हेडगेवार यांच्या प्रतिमेला हार घातल्यानंत
ghg


पुणे, 26 फेब्रुवारी (हिं.स.)। पुणे महानगरपालिकाच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिका भवनातील विविध नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले. मात्र डॉ. हेडगेवार यांच्या प्रतिमेला हार घातल्यानंतर शेजारील राजर्षी शाहू महाराज यांच्या तैलचित्राला हार न घालता केवळ नमस्कार केल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रकारावरून कोल्हापूरमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गटाने) या घटनेचा निषेध केला आहे. पक्षाचे वकील अनिल घाटगे यांनी पुण्याच्या महापौर व उपमहापौरांचा निषेध करण्याचा ठराव कोल्हापूर महानगरपालिकामध्ये मंजूर करून तो पुणे महानगरपालिकेला पाठवावा, अशी मागणी केली आहे.

अनिल घाटगे म्हणाले, “कोल्हापूर जिल्ह्याला लागून असलेल्या सीमाभागातील हजार वस्तीच्या गावातही छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभारलेले आहेत. पुण्यात शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता, तेव्हा राजर्षी शाहू महाराजांनी पुढाकार घेऊन पुण्यात प्रथम शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आणि त्यांच्या नावाने मेमोरियल उभारले. त्यामुळे शाहू महाराजांच्या प्रतिमेला हार न घालणे हा कोल्हापूर व बहुजन समाजाचा अपमान आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande