पुण्यात भाजप नेत्यांच्या नातेवाईकांना ‘स्वीकृत’ची संधी देणार ?
पुणे, 26 फेब्रुवारी (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने बहुमत मिळविल्यानंतर आता निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्यांना स्वीकृत नगरसेवक होण्याचे वेध लागले आहेत. संख्याबळानुसार दहा स्वीकृत नगरसेवकांपैकी सात जण हे भाजपचे असणार आहेत. निवडणुकीत ने
PMC news


पुणे, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने बहुमत मिळविल्यानंतर आता निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्यांना स्वीकृत नगरसेवक होण्याचे वेध लागले आहेत. संख्याबळानुसार दहा स्वीकृत नगरसेवकांपैकी सात जण हे भाजपचे असणार आहेत. निवडणुकीत नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपने घेतला. आता डावलेलेल्या नातेवाईकांना भाजप ‘स्वीकृत’ करणार का, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.महापालिका निवडणुकीत भाजपला ११९, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे २७, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला तीन, काँग्रेसला १५, शिवसेना ठाकरे पक्षाला एक जागा मिळाली. शिवसेना (शिंदे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) एकाही ठिकाणी विजय मिळविता आला नाही. आता स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. संख्याबळानुसार भाजपचे सात, राष्ट्रवादी काँग्रेसला दोन आणि काँग्रेसला एक जागा मिळणार आहे. या दहा जागांसाठी १९३ जणांनी अर्ज महापालिकेकडे आले आहेत. नऊ मार्च रोजी त्यापैकी दहाजणांची निवड होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande