संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व महाआवास अभियानांत ठाणे जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी
ठाणे, 26 फेब्रुवारी, (हिं.स.)। संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छतेच्या विचारांवर आधारित संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सन २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ तसेच २०२२-२३ या वर्षांतील स्पर्धेत निवड झालेल्या ग्रामपंचायतींच्या बक्षीस वितरणाचा
Sant Gadge Baba Gram Swachhta Abhiyan


ठाणे, 26 फेब्रुवारी, (हिं.स.)। संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छतेच्या विचारांवर आधारित संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सन २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ तसेच २०२२-२३ या वर्षांतील स्पर्धेत निवड झालेल्या ग्रामपंचायतींच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम विभागीय आयुक्त, कोंकण विभाग डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सिडको कार्यालय सभागृह, सातवा मजला, सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई येथे संपन्न झाला.

जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना यावेळी गौरविण्यात आले. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षातील विभागस्तरीय स्पर्धेमध्ये ग्रामपंचायत वडपे (ता. भिवंडी) यांनी द्वितीय क्रमांक पटकावत सन्मानचिन्ह व रुपये ९ लाखांचा धनादेश प्राप्त केला. तसेच ग्रामपंचायत जांभूळ (ता. कल्याण) यांनी तृतीय क्रमांक मिळवून सन्मानचिन्ह व रुपये ७ लाखांचा धनादेश प्राप्त केला.

पुरस्कारांचे वितरण विभागीय आयुक्त, कोंकण विभाग आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी नियोजन, लोकसहभाग व ग्रामस्तरावरील जनजागृती या बाबींमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संबंधित ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला.

याच कार्यक्रमात महा आवास अभियान २०२३-२४ अंतर्गत राज्य पुरस्कृत घरकुल योजना प्रभावीपणे राबविल्याबद्दल सर्वोत्कृष्ट जिल्हा – तृतीय क्रमांक हा पुरस्कार जिल्हा परिषद ठाणे यांना प्रदान करण्यात आला. राज्य पुरस्कृत आवास योजना २०२३-२४ अंतर्गत मानीवली ग्रामपंचायतीला तृतीय पारितोषिक मिळाले. घरकुल बांधकामाची गती, पारदर्शक अंमलबजावणी व लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा प्रभावी लाभ पोहोचविल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला.

या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छ विभाग) पंडित राठोड तसेच सर्व गट विकास अधिकारी आणि संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

कार्यक्रमास अप्पर आयुक्त (विकास) कोकण भवन डॉ. माणिक दिवे, संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण राजाराम दिघे, व्याख्याते प्रशांत देशमुख, अतिरिक्त सहाय्यक आयुक्त सिद्धराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड नेहा भोसले, जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आरती गगे, शालेय आरोग्य व स्वच्छता सल्लागार जिल्हा परिषद ठाणे सारिका देशमुख, पाणी व स्वच्छता सल्लागार जिल्हा परिषद ठाणे स्नेहल सोनवणे, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) ता. कल्याण पराग भोसले, ग्रामपंचायत अधिकारी वडपे भालचंद्र पवार, सरपंच वडपे प्रेमनाथ वाडोलकर, तात्कालीन सरपंच जांभूळ परीक्षित पिसाळ, तात्कालीन ग्रामपंचायत अधिकारी जांभूळ राजाभाऊ सुरवशे, ग्रामपंचायत अधिकारी जांभूळ अश्विनी यशवंतराव, उपसरपंच जांभूळ अक्षय सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष वडपे सुनील पाटील, माजी सरपंच वडपे शशिकला पाटील, सरपंच मानिवली सुकन्या गायकर, ग्रामपंचायत अधिकारी मानिवली स्वाती शेलार तसेच ग्रामपंचायत कर्मचारी मानिवली सुरेश गायकर आणि जिल्हा परिषद ठाणेचे इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वच्छता व ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात ठाणे जिल्ह्याने सातत्यपूर्ण व प्रभावी कामगिरी करत राज्य व विभागीय स्तरावर मानाचे स्थान मिळविल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. भविष्यातही अशाच प्रकारे लोकसहभागातून विकासकामे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande