
रत्नागिरी, 26 फेब्रुवारी, (हिं. स.) : जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरीतर्फे विज्ञान दिनानिमित्त २८ फेब्रुवारी २०२६ रोजी श्रीमान हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणात खगोलशास्त्र विषयक ‘आकाश दर्शन’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत होणार आहे. नामवंत खगोलशास्त्र अभ्यासक प्रा. बाबासाहेब सुतार खगोलशास्त्रविषयक मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमामध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन, स्लाइड शो आणि आकाशदर्शन असे कार्यक्रम अंतर्भूत आहेत. या कार्यक्रमासाठी रत्नागिरी परिसरातील विद्यार्थी, खगोल अभ्यासक आणि खगोलप्रेमी यांनी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष महेश दामले यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी