
सोलापूर, 26 फेब्रुवारी, (हिं.स.)। सोलापूरचे प्रथम नागरिक म्हणून महापौरपदी निवड झाल्याबद्दल मा. विनायक रामकृष्ण कोंड्याल यांचा शहरातील विविध तेलुगू सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तेलुगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालय, तेलुगू देशम पार्टी व डॉ. एन. टी. रामाराव शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा मंडळ (सोलापूर) यांच्यावतीने अध्यक्ष गणेरी तिप्पन्ना यांनी शुभेच्छापत्र देऊन अभिनंदन केले.
यावेळी इंजामुरी जनार्धन, पोतु रामुलू, गोसकी श्रीनिवास, चिन्नाराजु तिप्पन्ना, गणेरी श्रीनिवास, अक्कल नागनाथ, देवरकोंडा शंकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच कनकी नरसिंह, नंदल श्रीनिवास, बालकृष्ण, मल्लिकार्जुन कमटम, बालराजू बोल्ली, श्रीनिवास यंगनडुल, प्रभाकर भीमनाथ व श्रीनिवास गल्लि यांनीही अभिनंदन व्यक्त केले.सोलापूर शहरातील सुमारे पाच लाख तेलुगू भाषिक नागरिकांच्या वतीने महापौर कोंड्याल यांना शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच शहराच्या प्रगतीसाठी तेलुगू समाज सक्रिय सहकार्य करेल, अशी ग्वाहीही यावेळी देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड