मंडईतच बसा, नाहीतर कारवाई – सोलापूर मनपा आयुक्त
सोलापूर, 26 फेब्रुवारी (हिं.स.)। सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी आणि बाजारपेठेतील वाढता गोंधळ लक्षात घेऊन डॉ. सचिन ओम्बासे यांनी लक्ष्मी मार्केट (मंडई) परिसराची प्रत्यक्ष पाहणी करत भाजी विक्रेत्यांना स्पष्ट आदेश दिले. रस्त्यावर बसून विक्री केल्यास कठ
SMC Commisnar


सोलापूर, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।

सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी आणि बाजारपेठेतील वाढता गोंधळ लक्षात घेऊन डॉ. सचिन ओम्बासे यांनी लक्ष्मी मार्केट (मंडई) परिसराची प्रत्यक्ष पाहणी करत भाजी विक्रेत्यांना स्पष्ट आदेश दिले. रस्त्यावर बसून विक्री केल्यास कठोर कारवाई केली जाईल, तर सर्वांनी पालिकेने नेमून दिलेल्या मंडईतील जागेवरच व्यवसाय करावा, असा सक्त इशारा त्यांनी दिला.पाहणीदरम्यान आयुक्तांनी विक्रेत्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. स्वच्छता, बसण्याची व्यवस्था आणि मूलभूत सुविधांबाबतच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभाग प्रमुखांना तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.मंडई परिसरात नियमित स्वच्छता राखण्याची जबाबदारी संबंधित विभागावर सोपवण्यात आली आहे. या पाहणीवेळी मंडई विभाग प्रमुख तपन डंके, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे, पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande