
सोलापूर, 26 फेब्रुवारी, (हिं.स.)। हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे रविवारी (दि. १ मार्च) रोजी नवी पेठ येथील शिवस्मारक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी क्रूरकर्मा औरंगजेब याच्या छळाला भीक न घालता हिंदू धर्माकरिता स्वतःचे रक्त सांडून परमोच्च बलिदान दिले. त्या बलिदानाची आठवण राहण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो. त्यानिमित्त दरवर्षी शेकडो तरुण रक्तदान करून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन करतात. यंदाच्याहीवर्षी हिंदू बांधवांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना रक्तदानाने अभिवादन करावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड