अमरावती ग्रामीण पोलिस भरती शारीरिक चाचणीत ९,२९० उमेदवार उत्तीर्ण
अमरावती, 27 फेब्रुवारी (हिं.स.) अमरावती ग्रामीण पोलिस पोलिस दलातील शिपाई पदासाठी झालेल्या भरती प्रक्रियेत एकूण ९ हजार २९० स्त्री व पुरूष उमेदवारांची शारीरिक चाचणीत निवड झाली आहे. यात पुरूष ७,४०८ तर महिलांची संख्या १,८८२ आहे. रिक्त पदे मात्र केवळ २१
अमरावती ग्रामीण पोलिस भरती शारीरिक चाचणीत ९,२९० उमेदवार उत्तीर्ण


अमरावती, 27 फेब्रुवारी (हिं.स.) अमरावती ग्रामीण पोलिस पोलिस दलातील शिपाई पदासाठी झालेल्या भरती प्रक्रियेत एकूण ९ हजार २९० स्त्री व पुरूष उमेदवारांची शारीरिक चाचणीत निवड झाली आहे. यात पुरूष ७,४०८ तर महिलांची संख्या १,८८२ आहे. रिक्त पदे मात्र केवळ २१४ आहेत. अमरावती ग्रामीण पोलिस दलातर्फे पोलिस शिपाई संवर्गातील एकूण २१४ रिक्त पदांची भरती प्रक्रिया ११ ते २६ फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण-६९, महिला-६४, खेळाडू-१०, प्रकल्पग्रस्त-१०, भूकंपग्रस्त ४, माजी सैनिक-३१, अशंकालीन पदवीधर-१०, पोलिस पाल्य-६, गृहरक्षक दल-१० असे आरक्षण ठेवण्यात आले होते. भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने एकूण २१,२०६ अर्ज प्राप्त झाले होते त्यामध्ये पुरुष उमेदवार १६,२८६ व महिला उमेदवार ४,९२० होत्या. प्राप्त अर्जानुसार १६,२८६ पुरुष उमेदवारांपैकी प्रत्यक्ष भरतीकरिता ११,८७८ उमेदवार हजर झाले तर ४,४५५ उमेदवार गैरहजर होते. प्रत्यक्ष भरती दिलेल्या उमेदवारांपैकी कागदपत्र पडताळणी मध्ये २८, उंची मध्ये ६९६ उमेदवार अपात्र ठरले. शारीरिक चाचणीकरिता ११,१५१ उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी शारीरिक चाचणीमध्ये ७,४०८ उमेदवार उतीर्ण झाले असून अनुत्तीर्ण उमेदवारांची संख्या ३,७४२ आहे. ४,९२० महिला उमेदवारांपैकी प्रत्यक्ष भरतीकरिता ३,८७६ उमेदवार हजर होत्या, तर १,०४४ उमेदवार गैरहजर होत्या. उपस्थितांपैकी कागदपत्र पडताळणीमध्ये १२, उंची मध्ये ३०२ उमेदवार अपात्र ठरल्या. शारीरिक चाचणीकरिता ३,५७४ उमेदवार पात्र ठरल्या होत्या. त्यापैकी शारीरिक चाचणीमध्ये १,८८२ उमेदवार उतीर्ण झाल्या असून १,६९२ महिला अनुत्तीर्ण झाल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande