नांदेडला अटलबिहारी वाजपेयी यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणार - खा. अशोक चव्हाण
नांदेड, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाने नांदेडच्या जनतेला विविध आश्वासने जाहिरनाम्यात दिली होती. ती आश्वासने पूर्ण करण्यासाठी शंभर दिवसाच्या कृती आराखड्याच्या माध्यमातून प्रारंभ झाला आहे. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळून कामांना शिस्त
नांदेडला अटलबिहारी वाजपेयी यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणार - खा. अशोक चव्हाण


नांदेड, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाने नांदेडच्या जनतेला विविध आश्वासने जाहिरनाम्यात दिली होती. ती आश्वासने पूर्ण करण्यासाठी शंभर दिवसाच्या कृती आराखड्याच्या माध्यमातून प्रारंभ झाला आहे. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळून कामांना शिस्त लागणार आहे. अशी माहिती माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नदिड वाघाळा शहर महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे. महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीनंतर खा. अशोक चव्हाण यांनी विकासकामाचा आराखडा तयार करावा अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापौर सौ. कविता संतोष मुळे आणि मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी शंभर दिवसाचा शहरातील कामांचा कृती आराखडा तयार केला आहे याची माहिती त्यांनी दिली.

यानंतर पत्रकारांशी बोलतांना खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले की, ठरवून दिलेली कामे वेळेत व्हायला हवी. क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे याची जबाबदारी असून जे अधिकारी कामे करणार नाहीत त्यावर कारवाई करण्याचीही तरतूद आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत घनकचऱ्याचे व्यवस्थापन, गोदावरी नदीचे प्रदूषण रोखणे, पाणीपुरवठा संदर्भात दोन दिवसाआड मुबलक पाणी, रविनगर कौठा येथे २१०० नळ धारकांना २४ तास पाण्याची सुविधा, तसेच पाण्याच्या सुविधांचे बळकटीकरण, गोवर्धनघाट व सिडको येथे आधुनिक गॅस शवदहिनीचे काम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक, शेतकरी पुतळा, नमस्कार चौक यांचे नुतनीकरण, आठवडी बाजाराच्या ठिकाणी स्वच्छतागृह, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पुर्णाकृती पुतळा, वाहतूक सुरळीत करण्यासाठी ऑटोमॅटीक ट्राफिक सिग्नल, धोकादायक असलेल्या विद्युतवाहिन्या भूमिगत करणे, ७४ सेवा ऑनलाईन, महापुरूषांच्या पुतळ्याजवळ सीसीटिव्ही बसविणार, शिवाजीनगर येथील कस्तूरबा गांधी मातृसेवा केंद्रात उच्च रक्तदाब व मधुमेहासाठी विशेष कक्ष स्थापन, प्रमुख चौकहडको, विद्यापीठ, विष्णुपूरी, जाणापुरी, सोनखेड, मालेगाव, लिंबगाव, सांगवी व ईतर ठिकाणी ये-जा करण्यासाठी शहरात शहर बसची व्यवस्था नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रहदारीसाठी अडचण होत आहे. लहान मुलांसह कुटूंबाला शहरातून प्रवास जवळच्या ठिकाणी करायचा असेल तर त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले की, शहरामध्ये वाहतूक व्यवस्था असणे आवश्यक आहे त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे इलेक्ट्रीक बसची व्यवस्था केलेली आहे. त्यांच्याकडे नांदेड येथे या बस उपलब्ध करून द्याव्यात यासाठी मागणी करणार आहे. त्यातून नांदेडकरांची होणारी गैरसोय दूर होईल असे खा. अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

अतिक्रमण मुक्त करणार, शाळेमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे, शहरात १० हजार वृक्षांची लागवड आदी कामा संदर्भात येथे माहिती देण्यात आली. याबद्दल खा. चव्हाणांनी समाधान व्यक्त करीत भाजपचा वचननामा पूर्ण होण्यासाठी एक पाऊल पुढे असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande