
अकोला, 27 फेब्रुवारी (हिं.स.) : राजधानी दिल्लीतील मद्य धोरण घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड घडली असून न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या 23 नेत्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या निर्णयाचे आम आदमी पक्षाचे राज्याचे महासचिव अरविंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अकोल्यात पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत निकालाचे स्वागत केले. “अखेर सत्याचा विजय झाला आहे. केजरीवाल आणि सिसोदिया हे भ्रष्टाचारी नसून इमानदार आहेत,” अशा शब्दांत भावना व्यक्त करण्यात आल्या.
-------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे