अकोला महापालिकेची थकबाकीदारांवर कारवाई; दोन फ्लॅट सील
अकोला, 27 फेब्रुवारी (हिं.स.) :मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये तसेच अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, उपायुक्त विजय पारतवार आणि सहायक आयुक्त राजेश सरप यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला महानगरपालिका क्षेत्रात थकित मालमत्ता कर वसुलीसाठी कारवाई
Photo


अकोला, 27 फेब्रुवारी (हिं.स.) :मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये तसेच अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, उपायुक्त विजय पारतवार आणि सहायक आयुक्त राजेश सरप यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला महानगरपालिका क्षेत्रात थकित मालमत्ता कर वसुलीसाठी कारवाई करण्यात आली.

पूर्व झोन अंतर्गत राज सरोवर सातव चौक, जठारपेठ, अकोला येथील वार्ड क्र. A3, मालमत्ता क्र. 2360 धारक रंजीत राठोड यांच्याकडे सन 2018-19 पासून आजपर्यंत एकूण ₹54,301 इतका मालमत्ता कर थकीत होता. संबंधित फ्लॅटला मनपाकडून सील लावण्यात आली.

तसेच हर्ष संकुल कॉम्प्लेक्स, अकोला येथील वार्ड क्र. A1, मालमत्ता क्र. 230 धारक विक्रम राजूरकर यांच्याकडे सन 2017-18 पासून आजपर्यंत ₹11,04,970 इतका मालमत्ता कर थकीत असल्याने संबंधित फ्लॅटला देखील सील ठोकण्यात आली.

या कारवाईदरम्यान जप्ती पथक प्रमुख सुधीर मिसुरकर, कर वसुली लिपिक संतोष राजे, शुभम रील, राजेश साळुंखे, संतोष पांडे, दीपराज महल्ले, संतोष वेले, जय मोरे, विठोबा दळु, गणेश पद्मने तसेच सुरक्षा रक्षक संगीता शिंदे आदी उपस्थित होते.

दरम्यान, अकोला महानगरपालिका प्रशासनाने शहरातील सर्व मालमत्ता धारकांना थकीत व चालू वर्षाचा मालमत्ता कर एकरकमी भरून सील, जप्ती व लिलाव यांसारखी अप्रिय कारवाई टाळण्याचे आवाहन केले आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande