जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा!
अकोला, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। वाचन संस्कृतीत जीवन बदलण्याची प्रेरणा आहे.ग्रंथवाचनातून एकाच आयुष्यात अनेक आयुष्य जगण्याचा अनुभव मिळतो त्यामुळे भाषेचा व्यावहारिक वापर आग्रहपूर्वक वाढला पाहिजे. मातृभाषेची प्रेरणा प्रत्येकाने जपली पाहिजे, असे प्रतिप
Photo


अकोला, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। वाचन संस्कृतीत जीवन बदलण्याची प्रेरणा आहे.ग्रंथवाचनातून एकाच आयुष्यात अनेक आयुष्य जगण्याचा अनुभव मिळतो त्यामुळे भाषेचा व्यावहारिक वापर आग्रहपूर्वक वाढला पाहिजे. मातृभाषेची प्रेरणा प्रत्येकाने जपली पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ सदस्य डॉ.गजानन नारे यांनी आज केले.

कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी राजभाषा गौरव दिन जिल्हा मराठी भाषा समिती,विदर्भ साहित्य संघ अकोला,अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच यांच्या विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहातसाजरा करण्यात आला. त्यावेळी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.यावेळी उपजिल्हाधिकारी जोगेंद्र कट्यारे, जिल्हाधिकारी कार्यालय अधीक्षक श्याम धनमने,जिल्हा मराठी भाषा समिती अशासकीय सदस्य सुरेश पाचकवडे, डॉ.विनय दांदळे,श्याम ठक,डॉ. मयूर लहाने एमकेसीएलचे श्रीतेज गावंडे,विदर्भ साहित्य संघ अकोला शाखा अध्यक्ष विजय कौसल, सचिव प्रा.डॉ.सुहास उगले,सदस्य लता कराळे आदी उपस्थित होते.

वाचन संस्कृती लोप पावत आहे का?विषयावरील परिसंवादात डॉ.कल्पना गोरले (थोरात) यांनी मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून आपल्या संस्कृतीची आणि अस्मितेची ओळख असल्याचे नमूद केले.प्रा.डॉ.हरिदास आखरे यांनी मराठी भाषेची अस्मिता प्रत्येकाने जपली पाहिजे.शासनाच्या सर्व योजना व सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी मराठीचा सक्षम वापर करणे आवश्यक असल्याचे सांगितले.प्रास्ताविक व आभार शाम धनमने यांनी व्यक्त केले

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande