
अकोला, 27 फेब्रुवारी (हिं.स.) :अकोला महानगरपालिका प्रशासनामार्फत शहरातील नागरिकांना त्यांचा थकित मालमत्ता कर भरणे आर्थिकदृष्ट्या सोयीचे व्हावे यासाठी 14 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत तीन टप्प्यांत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
नागरिकांना थकित तसेच चालू वर्षाचा मालमत्ता कर भरणे अधिक सुलभ व्हावे यासाठी शनिवार दि. 28 फेब्रुवारी आणि रविवार dि. 1 मार्च 2026 रोजी कार्यालयीन वेळेत दोन दिवसीय विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
पूर्व झोन
शनिवार 28 फेब्रुवारी 2026 :- दुर्गा चौक, मूळतकर टेलर (उमरी रोड), काळा मारोती मंदिर (रामनगर), सावित्रीबाई फुले शाळा (धम्मकुटी बाजूला), विश्वकर्मा मंदिर (मोठी उमरी), बहुजन नगर (शिवणी), जिल्हा परिषद शाळेसमोर (गुडधी).
**दि. 1 मार्च 2026 :** स्कायलार्क हॉस्पिटल (श्रावगी प्लॉट), सातव चौक (जठारपेठ), जी.एम.डी. मार्केट जवळ (जवाहर नगर), स्वामी समर्थ केंद्राजवळ (लहान उमरी), डवले कॉलेज जवळ (चाचोंडी रोड, मोठी उमरी), महाकाली मंदिर (उमरी रोड), प्रकाश आंबेडकर नगर (शिवर), हॉलिडे बार जवळ (गुडधी, मोठी उमरी).
00000000000000000000
###
पश्चिम झोन
किराणा मार्केट जवळ, शहाबाबू शाळा (नर्सिंग कॉलनी), शिवाजी शाळेजवळ (हरिहर पेठ), दसरा नगर (वाशीम रोड), मनपा उर्दू मु. शाळा क्र. 2 (भांडपुरा), सोनटक्के प्लॉट, राजू बाबा सभागृह, 26 नंबर शाळा, खंडेलवाल शाळेजवळ, बाळापुर नाक्याजवळ (डाबकी रोड), नवाब पुरा, जुने शहर, भीमनगर चौक, दगडी पुलाजवळ, अमानत चौक, भगतवाडी गल्ली क्र. 4, महाराणा हार्डवेअर (चौधरी दुकानाजवळ, गजानन नगर गल्ली क्र. 4), गंगा नगर (बिलाला मशीद जवळ).
उत्तर झोन
ताजना पेठ पोलीस चौकी समोर, सुभाष चौक, रेड सोसायटी जवळ, बादशहा खान चौक, मनकर्णा प्लॉट, माळीपुरा, भगतसिंग चौक, शिवाजी कॉलेज समोर, देशमुख फैल, शिवाजी पुतळ्याजवळ, भवानी पेठ, मोचीपुरा, पोलीस चौकी जवळ, अकबर प्लॉट, अकोट फैल, मनपा शाळा क्र. 18, मुकंदवाडी, भारत नगर, गरीब नवाज मशीद जवळ, न्यू तापडिया नगर (गणपती मंदिर जवळ).
दक्षिण झोन
मनपा मोटर वाहन विभागाजवळ (खोलेश्वर नगर), वैभव हॉटेल जवळ, इन्कम टॅक्स चौक, अहुजा सिमेंट दुकानासमोर (सिंधी कॅम्प), फैयाज खान (नगरसेवक) यांच्या घरासमोर (हैदरपुरा), गजानन महाराज मंदिर, हिंगणा रोड (बलोदे लेआउट), डी-मार्ट (रिंग रोड), ग्रामपंचायत समोर (मलकापूर), माऊली गॅरेज, जि.प. नगर चौक (जि.प. कॉलनी), खडकी बु., धर्माजी वानखेडे यांचेजवळ, गजानन किराणा समोर (शिवणी).
नागरिकांनी या विशेष कॅम्पचा लाभ घेऊन थकित व चालू वर्षाचा मालमत्ता कर एकरकमी भरून मनपा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने व उपायुक्त विजय पारतवार यांनी केले आहे.
----------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे