
परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात शासकीय जागेवर तसेच हायमास्ट पोलवर अनधिकृत डिजिटल बॅनर व होर्डिंग्ज लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या संदर्भात परभणीचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी आणि महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांनी संयुक्तपणे निर्देश जारी केले आहेत.
प्रशासनाच्या आदेशानुसार, यापुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोलवर किंवा जमिनीवर कोणतेही डिजिटल बॅनर अथवा होर्डिंग्ज विनापरवाना लावल्यास संबंधितांवर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याबाबतचे स्पष्ट इशारे देणारे सूचना फलक चौक परिसरात लावण्यात आले आहेत. यावेळी पोलीस कर्मचारी तसेच महानगरपालिकेचे मुख्य स्वच्छता अधिकारी करण गायकवाड आणि सुरक्षा विभागाचे नासेर खान उपस्थित होते.
--------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis