
नाशिक, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।
- नाशिक मध्ये कार्यक्रमाला येताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बंदी घालण्यात आलेल्या व्हीएसआर कंपनीच्या विमानातून केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे चांगलेच खळब उडाली असून बंदी घातलेल्या विमानातून मुख्यमंत्र्यांनी प्रवास का केला असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
उद्या 28 फेब्रुवारी रोजी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला एक महिन्याच्या कालावधी पूर्ण होत आहे. या कालावधीमध्ये अनेक वेळा ज्या व्हीएसआर कंपनीच्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते आणि त्याची दुर्घटना झाली त्या विमानावरती अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. याबाबत डीजीसीएने देखील काही प्रमाणामध्ये व्हीएसआर कंपनीच्या विमानांवरती बंदी घातली आहे.
हे सर्व असताना देखील नाशिक मध्ये शुक्रवारी विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी येताना आणि जाताना विमान प्राधिकरणाने बंदी घातलेल्या व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवास केला. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी निश्चित काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे, असा प्रश्न देखील या निमित्याने उपस्थित होत असून बंदी असतानाही सुरक्षा विभागाकडून या विमानातून प्रवास करण्यासाठी परवानगी कशी दिली गेली असा प्रश्न देखील या निमित्याने पुढे आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV