सिंगणापुर फाट्यावरील ‘रास्ता रोको’ प्रकरणी खासदारांसह आंदोलक शेतकर्यांवर गुन्हे दाखल
परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी तालुक्यातील सिंगणापूर फाटा येथे रास्ता रोको करण्यात आले होते. या प्रकरणी आयोजक खासदार संजय जाधव यांच्यासह आंदोलक शेतकर्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल
सिंगणापुर फाट्यावरील ‘रास्ता रोको’ प्रकरणी खासदारांसह आंदोलक शेतकर्यांवर गुन्हे दाखल


परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।

शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी तालुक्यातील सिंगणापूर फाटा येथे रास्ता रोको करण्यात आले होते. या प्रकरणी आयोजक खासदार संजय जाधव यांच्यासह आंदोलक शेतकर्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातून जात असलेल्या शक्तिपीठ महामार्गासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या जमीन अधिग्रहण मोजणीच्या पार्श्वभूमीवर आणि शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वात तालुक्यातील सिंगणापूर फाटा येथे रास्ता रोको करण्यात आले होते. सिंगणापूर फाटा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, प्रसाद गोरे, गणेशराव घाडगे, काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, पांडुरंग खिल्लारे आदींसह इतर दहा ते पंधरा शेतकरी आंदोलकांनी एकच जिद्द - शक्तीपीठ रद्द आणि महाराष्ट्र शासनाविरुद्ध घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी यांच्या जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिस अंमलदार अमोल डुबे यांच्या फिर्यादीवरून दैठणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार बळीराम मुंढे हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande