चंद्रपूर : बांधकाम कामगारांची नोंदणी आणि सेवा नि:शुल्क
चंद्रपूर, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)। कामगार विभागामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण करण्यात येऊन त्यांना विविध योजनांचे लाभ दिले जातात. नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्ज संगण
चंद्रपूर : बांधकाम कामगारांची नोंदणी आणि सेवा नि:शुल्क


चंद्रपूर, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)। कामगार विभागामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण करण्यात येऊन त्यांना विविध योजनांचे लाभ दिले जातात. नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्ज संगणक प्रणालीवर सादर केल्यावर कर्मचारी व नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत अर्ज निकाली काढले जातात. अर्ज मंजूर - नामंजूर असल्यास एसएमएस द्वारे कारणासह कामगारास कळविल्या जाते. सदरच्या सेवा मंडळामार्फत निःशुल्क राबविण्यात येतात.

बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट त्यांच्या बँकेच्या खात्यात देण्यात येतो. याकरीता कोणतेही शुल्क आकरण्यात येत नाही. ही सर्व कामे ऑनलाईन असून ते कोणत्याही एजेंट, दलाल, मध्यस्थ किंवा संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत नाही. या ऑनलाईन कामाकरीता कोणीही पैशाची - कमिशनची लाचेची मागणी केल्यास मंडळाच्या जिल्हा कार्यालयास किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागास तक्रार करावी, अशा प्रकारच्या सुचना मंडळाच्या प्रत्येक जिल्हा कामगार सुविधा केंद्र व तालुका कामगार सुविधा केंद्र येथे लावण्यात आलेल्या आहेत.

नोंदणी, नुतनीकरण व लाभासाठी अर्ज प्राप्त झाल्यावर कामगारास त्याने निवडलेल्या तारखेस कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात येते. लाभाच्या अर्जासंदर्भातील उपस्थित राहण्याबाबतच्या पत्रात देखील मंडळाकडून देण्यात येणारे लाभ हे विनामूल्य असून, कोणाकडूनही पैशाची अथवा लाचेची मागणी झाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निःशुल्क क्रमांक 1064 अधवा दूरध्वनी क्रमांक अथवा ईमेल achwebmail@mahapolic.gov.in वर तक्रार नोंदवावी. त्यामुळे कामगारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त प्र.भि. कावळे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande