परभणी जिल्ह्यात अवकाळीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान
परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.) : परभणी जिल्ह्यातील विविध भागांत वादळी वार्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, भाजीपाला तसेच आंबा, डाळिंब, द्राक्ष, टरबूज यांसारख्या फळपिकांना प्रचंड न
परभणी जिल्ह्यात अवकाळीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान


परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.) : परभणी जिल्ह्यातील विविध भागांत वादळी वार्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, भाजीपाला तसेच आंबा, डाळिंब, द्राक्ष, टरबूज यांसारख्या फळपिकांना प्रचंड नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील सोनपेठ, पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा, पालम, गंगाखेड आदी तालुक्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान गंभीर असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर आमदार राजेश विटेकर आणि आमदार रत्नाकरराव गुट्टे यांनी विधानसभेत तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली.सभागृहात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची ग्वाही दिली की, परभणीसह राज्यातील इतर जिल्ह्यांत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याचे प्रशासनाला मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता गहू, ज्वारी, हरभरा तसेच फळबागांतील आंबा व डाळिंब यांसारख्या पिकांचे नुकसान गंभीर असून, द्राक्ष व टरबूज पिकांनाही मोठा फटका बसला आहे. विविध आमदारांनी संसदीय माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले असून महसूलमंत्र्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये हवालदिल स्थिती असून प्रशासनाने जलद प्रतिसाद देण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande