परभणी - अनिकेत शेरे मृत्यू प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी
परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.) सेलू येथील २४ वर्षीय अनिकेत शेरे मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना निवेदनाद्वारे केली आहे.

अनिकेत शेरे ९ फेब्रुवारी २०२५ रोजी बेपत्ता झाला होता. तो मोंढा परिसरातील एका कापड दुकानात काम करत होता. त्याला दोन मित्रांनी दुकानातून बोलावून नेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी वडील बळवंत शेरे पाटील यांनी सेलू पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदवली. मात्र, दीर्घकाळ कारवाई न झाल्याने कुटुंबीयांनी १२ फेब्रुवारी २०२६ पासून पोलीस ठाण्यासमोर तीन दिवसांचे धरणे आंदोलन केले.तपासादरम्यान अनिकेत शेरे एका वर्षापूर्वी मयत झाल्याचे आणि त्याचा अंत्यविधी पोलीसांनी परस्पर उरकून टाकल्याचे समोर आले. या प्रकरणात दोन मित्रांविरुद्ध १ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल झाला असून त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शिष्टमंडळाने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली असून, उपमहानिरीक्षक उमाप यांनी पीडित कुटुंबीयांना न्याय मिळेल, असे आश्वासन दिले.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis

 rajesh pande