
परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। शक्तीपीठ महामार्गाबाबत येत्या 5 मार्च रोजी बाधीत शेतकर्यांबरोबर एका बैठकीद्वारे चर्चा केली जाईल, असे ठोस आश्वासन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शक्तीपीठ बाधित शेतकर्यांनी बेमुदत उपोषण सुरु केले. त्यास मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी भेट दिली. पाठोपाठ त्यांचे म्हणणे ऐकुण घेतले व महसूलमंत्री बावनकुळे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी महसूलमंत्र्यांनी येत्या 5 मार्चला बैठकीचे आश्वासन दिले. त्यामुळे शक्तीपीठबाधित उपोषण कर्त्यांनी मनोज जरांगे यांच्या हस्ते पाणी घेऊन हे उपोषण स्थगित केले.यावेळी खासदार संजय जाधव, महापौर सय्यद इकबाल उपस्थित होते. यावेळी मराठा आरक्षणाचे नेते पाटील म्हणाले की शेतकर्यांची मागणी नसतानाही शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे, पोलिसीबळाचा वापर करून सरकारने शेतकर्यांचे जमीन बळजबरी मोजणी करू नये, असे म्हटले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis