छ. संभाजीनगरात जिल्हास्तरीय लोकशाही दिन २ मार्च रोजी
छत्रपती संभाजीनगर, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजीत केला जातो. मार्च महिन्यात सोमवार दि.२ रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजीत करण्यात आला आहे. हा लोकशाही दिन सोमवार दि.२ रोजी दुपारी १२ वा. जिल
छ. संभाजीनगरात जिल्हास्तरीय लोकशाही दिन २ मार्च रोजी


छत्रपती संभाजीनगर, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजीत केला जातो. मार्च महिन्यात सोमवार दि.२ रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजीत करण्यात आला आहे.

हा लोकशाही दिन सोमवार दि.२ रोजी दुपारी १२ वा. जिल्हाधिकारी कार्यालयात होईल. तक्रारदारांनी आपले अर्ज प्रथम तालुका लोकशाही दिनात सादर कर्वे. त्यानंतर एक महिन्यांनी टोकन पावती जोडून जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार दाखल करावी. तक्रार दाखल करतांन अर्ज विहित नमून्यात असावा. तक्रार, निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असावे. तालुकास्तरावर दाखल केल्याची पोहोच पावती सोबत जोडावी. लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, राजस्व अपिल, सेवा, आस्थापनाविषयक बाबी, यापूवी लोकशाही दिनात दाखल केलेले अर्ज स्विकारले जात नाहीत.

तरी तक्रारदारांनी आपली तक्रार दाखल करावी असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. लोकशाही दिनात नागरिकांना तक्रारी करता येणार आहेत या तक्रारींचे निवारण देखील होणार आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande