
बीड, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)। शुक्लतीर्थ व वांगी देवस्थान साठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती डॉ ओमप्रकाश शेटे यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, 2023 पासून केलेल्या प्रामाणिक पाठपुराव्याला यश आले. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजनेअंतर्गत संत नारायण बाबा देवस्थान वांगी व श्री क्षेत्र शुक्लेश्वर देवस्थान मौजे शुक्लतीर्थ लिमगाव ता.माजलगाव येथील दोन्ही देवस्थानासाठी तब्बल पाच कोटी रुपयांच्या आसपास निधी मंजूर करून प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
मतदारसंघातील दोन्ही देवस्थानच्या विकासाकरिता दिलेली ही मदत अनमोल आहे. खऱ्या अर्थाने अशी देवस्थाने दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाद्वारे जिल्ह्यातील जातीयतेची दरी कमी करण्यात मदत करतात, असे डॉक्टर शेटे यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis