महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मराठी गौरव व महिला सक्षमीकरण सप्ताहाचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 27 फेब्रुवारी (हिं.स.) – मराठी भाषा गौरव दिन आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन (दि. ८ मार्च) च्या औचित्याने जिल्हाधिकारी कार्यालय आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आल
महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मराठी गौरव व महिला सक्षमीकरण सप्ताहाचे आयोजन


छत्रपती संभाजीनगर, 27 फेब्रुवारी (हिं.स.) – मराठी भाषा गौरव दिन आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन (दि. ८ मार्च) च्या औचित्याने जिल्हाधिकारी कार्यालय आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने अधिकाधिक महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या सप्ताहात ऑनलाइन आणि प्रत्यक्ष स्वरूपात खालील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे:

ऑनलाइन स्पर्धा:

1. निबंध स्पर्धा (०२ मार्च २०२६) – विषय:

मी कर्तृत्ववान – कर्तृत्वाचा प्रवास

माझ्या जीवनातील प्रेरणादायी स्त्री पात्र

कामकाजात मराठी भाषेचे महत्त्व

मराठी भाषा आणि संस्कृती

2.चारोळी / घोषवाक्य स्पर्धा (०३ मार्च २०२६) – विषय:

*स्त्री शक्ती, आत्मविश्वास व समानता

मराठी भाषेचा अभिमान

3. स्लोगन स्पर्धा (०४ मार्च २०२६)– उदाहरण:

* “माझी भाषा – माझा अभिमान”

“स्त्री सक्षमीकरण – समाजाचा विकास”

4. चित्रकला स्पर्धा (०५ मार्च २०२६)– विषय:

महिला सन्मान व समानतेची जाणीव

मराठी संस्कृती आणि परंपरा

प्रत्यक्ष कार्यक्रम (०६ व ०७ मार्च २०२६):

कविसंमेलन

रांगोळी स्पर्धा

फॅन्सी ड्रेस व रॅंपवॉक

अन्नपूर्णा डिश स्पर्धा

सांस्कृतिक सादरीकरण

जिल्ह्यातील सर्व महिला अधिकारी, महिला कर्मचारी, महिला शिक्षिका आणि शिक्षण विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून हा सप्ताह यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सहभागासाठी सर्व स्पर्धांमध्ये ऑनलाइन नोंदणी लिंक उपलब्ध असून, त्याद्वारे सहभाग नोंदवावा, असे कळविण्यात आले आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande