एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे घवघवीत यश
परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत डिसेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता आठवीच्या एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर झाला. या परीक्षेत ज्ञानसाधना प्रतिष्ठान, परभणी येथील इयत्ता आठवीचे तब्बल 164 व
एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे घवघवीत यश


परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत डिसेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता आठवीच्या एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर झाला. या परीक्षेत ज्ञानसाधना प्रतिष्ठान, परभणी येथील इयत्ता आठवीचे तब्बल 164 विद्यार्थी उत्तीर्ण ठरले असून संस्थेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेचा नावलौकिक वाढवला असून त्यांच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष मा. प्रा. किरण सोनटक्के सर, सचिव प्रा. सौ. शितल सोनटक्के मॅडम तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले. या यशामुळे पालकांचा व विद्यार्थ्यांचा ज्ञानसाधना प्रतिष्ठान, परभणीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून गुणवत्तापूर्ण व विद्यार्थी-केंद्रित शिक्षणासाठी संस्था पुढील काळात नवे शैक्षणिक उपक्रम राबविणार असल्याची माहिती देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande