मेळघाटात राणा दांपत्याची होळी; अपघातग्रस्त कुटुंबीयांची घेणार भेट
अमरावती, 27 फेब्रुवारी (हिं.स.) दरवर्षीप्रमाणे यंदाही आ. रवी राणा व भाजप नेत्या, माजी खासदार नवनीत राणा हे मेळघाटातील आदिवासी बहुल भागात जाऊन स्थानिक बांधवांसोबत पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करणार आहेत. 2 व 3 मार्च रोजी त्यांचा चिखलदरा व धारणी ताल
मेळघाटात आ. रवि राणा व माजी खासदार नवनीत राणा यांची होळी; अपघातग्रस्त कुटुंबीयांची घेणार भेट


अमरावती, 27 फेब्रुवारी (हिं.स.)

दरवर्षीप्रमाणे यंदाही आ. रवी राणा व भाजप नेत्या, माजी खासदार नवनीत राणा हे मेळघाटातील आदिवासी बहुल भागात जाऊन स्थानिक बांधवांसोबत पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करणार आहेत. 2 व 3 मार्च रोजी त्यांचा चिखलदरा व धारणी तालुक्यात दोन दिवसीय दौरा होणार आहे.या दौऱ्यात हरीसाल, कंजुली, सुसर्दा, साद्राबादी, बसपनी, दिया, धर्मामहु, धाकर्माल, चाकरडा, उतावली, सेमाडोह, खटकाली, आमझरी, तेटू, कामापुर, बोरी, जामुननाला, जामलीवन, बेला, सलोना, घटांग, भिलोरी, बिहाली व कोहाना आदी गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला जाणार आहे. स्थानिक समस्या व शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे.दौऱ्यादरम्यान धारणी तालुक्यातील शिवझिरी घाटातील भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या मजुरांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करण्यात येणार आहे. अपघातग्रस्त कुटुंबांना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी, यासाठी विधानसभेत आग्रही मागणी करणार असल्याचे आ. राणा यांनी सांगितले. “मृतांची भरपाई कधीच होऊ शकत नाही; मात्र शासनाने कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे,” असे त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande