संविधान सभेत सर्व घटकांचे प्रतिनिधित्व : प्राचार्य डॉ. अनिल सिंगारे
परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। परभणी येथील शारदा महाविद्यालयात स्वाराति मराठवाडा विद्यापीठ व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेअंतर्गत ‘भारतीय संविधान निर्मिती’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. क
Q


परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।

परभणी येथील शारदा महाविद्यालयात स्वाराति मराठवाडा विद्यापीठ व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेअंतर्गत ‘भारतीय संविधान निर्मिती’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बबन पवार होते, तर प्रमुख अतिथी म्हणून ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल सिंगारे उपस्थित होते. व्यासपीठावर हिंगोली येथील संजय जाधव, उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे व कार्यालय प्रमुख सुरेश जयपूरकर यांची उपस्थिती होती.

प्रमुख वक्ते डॉ. अनिल सिंगारे यांनी भारतीय संविधान निर्मितीचा इतिहास सविस्तर उलगडून सांगितला. संविधान सभेत सर्व घटकांचे प्रतिनिधित्व राहील याची घेतलेली काळजी, महिलांना स्थान देण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय आणि कलम ३५६ सारख्या महत्त्वपूर्ण तरतुदींचा देशाच्या एकात्मतेसाठी असलेला उपयोग यावर त्यांनी प्रकाश टाकला. विविधता असूनही भारत आज अखंड व सक्षम राष्ट्र म्हणून उभा आहे, यामागे राज्यघटनेतील दूरदृष्टी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच संविधान निर्मितीची प्रक्रिया, सदस्यांची निवड, खर्च, लेखनकार्य ते २६ जानेवारी १९५० रोजी अंमलबजावणीपर्यंतचा प्रवास त्यांनी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांसमोर मांडला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande