बीड - जयभवानीचे 111 दिवसामध्ये 524787 मेट्रिक टन गाळप पूर्ण
बीड, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)। गढी येथील जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या 43 व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान कुंभेजळगाव येथील महंत दत्ता महाराज गिरी आणि जयभवानी कारखान्याचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब नाटकर यांच्या हस्ते
बीड - जयभवानीचे 111 दिवसामध्ये 524787 मेट्रिक टन गाळप पूर्ण


बीड, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)। गढी येथील जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या 43 व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान कुंभेजळगाव येथील महंत दत्ता महाराज गिरी आणि जयभवानी कारखान्याचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब नाटकर यांच्या हस्ते विधिवत पुजा करुन संपन्न झाला.

यावेळी बोलतांना कारखान्याचे व्हा. चेअरमन भाऊसाहेब नाटकर म्हणाले की, कारखान्याच्या 50 वर्षाच्या काळामध्ये कारखान्याने मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. शिवाजीराव दादांनी पाहिलेले स्वप्न साकार होतांना दिसून येत आहे. हा गळीत हंगाम सर्व ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक ठेकेदार, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी/कामगार, संचालक आणि हितचिंतकांनी केलेल्या सहकार्यातुन यशस्वी झालेला आहे. 111 दिवसामध्ये कारखान्याने 524787 मेट्रिक टन गाळप पूर्ण केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान चे महंत ह.भ.प. गुरुवर्य दत्ता महाराज गिरी यांनी आशिर्वादपर मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बोलताना जयभवानी कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे म्हणाले की, गळीत हंगाम 2025-26 मध्ये कार्यक्षेत्रात 14656 हेक्टर नोंदीचा ऊस उपलब्ध होता. या हंगामाकरीता मोठे व मिनी ट्रॅक्टर मिळून 450 व टायर बैलगाडी 184 व 15 हार्वेस्टर अशी ऊस तोड यंत्रणा उभारली होती. या हंगामामध्ये सुरूवातीपासून प्रती दिन 5000 ते 5500 मे.टना प्रमाणे गाळप करून अवघ्या 111 दिवसामध्ये कारखान्याचे 524787 मे.टन गाळपाचा टप्पा पूर्ण केला. व त्यापासून 453120 क्विंटल साखर उत्पादन केले. तसेच

या हंगामातील डिस्टिलरीचे उत्पादन सुरु असून आज अखेर 43 लाख 45 हजार बल्क लिटर स्पिरीट उत्पादन झाले असून डिस्टिलरी माहे मे 2026 अखेर पर्यन्त चालू राहणार आहे. या हंगामा मधील ऊस बिलाचे पेमेंट रु.2775 प्रती मे. टनाप्रमाणे शेतकर्यांच्या बैंक खात्यात जमा केलेले आहेत. उर्वरित ऊस बिल व तोडणी वाहतूक बिल (कमिशन डिपॉझिटसह) लवकरच अदा करणार आहोत. तसेच कारखान्यास सन 2024-25 मधील देशपातळीवरील नामांकीत संस्था वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट पुणे यांचे कडून उत्कृष्ट तांत्रिक क्षमता तृतीय पुरस्कार मिळाले

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande