मैत्री गटात खा. रवींद्र चव्हाण यांची सदस्य म्हणून नियुक्ती
नांदेड, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।भारत आणि ओमान या देशांमधील संसदीय संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने १८ व्या लोकसभेच्या कालावधीसाठी स्थापन झालेल्या मैत्री गटात खा. रवींद्र चव्हाण यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारत ओमान संसदीय मैत्र
मैत्री गटात खा. रवींद्र चव्हाण यांची सदस्य म्हणून नियुक्ती


नांदेड, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।भारत आणि ओमान या देशांमधील संसदीय संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने १८ व्या लोकसभेच्या कालावधीसाठी स्थापन झालेल्या मैत्री गटात खा. रवींद्र चव्हाण यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भारत ओमान संसदीय मैत्री गटाची स्थापना करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाच्या कॉन्फरन्स अँण्ड प्रोटोकॉल शाखेकडून या संदर्भातील अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे. लोकसभेच्या अध्यक्षांनी त्यांची या गटावर निवड केली आहे. तरुण आणि तळमळीचे नेतृत्व म्हणून ते ओळखले जातात. संसदीय कामकाजात अभ्यासू वृत्ती आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी ते समर्थपणेपार पाडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या भूमिकेला अधिक प्रभावीपणे मांडण्यास ते नक्कीच हातभार लावतील, अशी अपेक्षा आहे.

गटाचे अध्यक्ष म्हणून खा. असदुद्दीन ओवैसी यांची नियुक्ती करण्यात आली असून लोकसभा व राज्यसभेतील एकूण ११ खासदारांचा या गटात समावेश आहे. भारत आणि ओमान यांच्यात ऐतिहासिक व व्यापारी संबंध जुने असून, ऊर्जा, व्यापार, सांस्कृतिक देवाण घेवाण आणि भारतीय प्रवासी समुदायाच्या माध्यमातून दोन्ही देशांमध्ये घनिष्ठ संबंध आहेत. नव्याने स्थापन झालेल्या या संसदीय मैत्री गटाच्या माध्यमातून द्विपक्षीय सहकार्य, संसदीय संवाद आणि धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न होणार आहे. राजकीय व राजनैतिक स्तरावर या निर्णयाचे स्वागत होत आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande