मुलांच्या हातात मोबाइल ऐवजी ज्ञानेश्वरी ग्रंथ द्या - महंत विवेक महाराज शास्त्री
बीड, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)। शिरूर कासार येथील भगवान बालाजीमूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा २४ वा वर्धापन दिन सोहळ्याची काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने सांगता झाली. आपल्या घरातील मुलांच्या हातात मोबाइल ऐवजी ज्ञानेश्वरी ग्रंथ देण्याचे आवाहन विवेक शास्त्री
मुलांच्या हातात मोबाइल ऐवजी ज्ञानेश्वरी ग्रंथ द्या - महंत विवेक महाराज शास्त्री


बीड, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)। शिरूर कासार येथील भगवान बालाजीमूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा २४ वा वर्धापन दिन सोहळ्याची काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने सांगता झाली. आपल्या घरातील मुलांच्या हातात मोबाइल ऐवजी ज्ञानेश्वरी ग्रंथ देण्याचे आवाहन विवेक शास्त्री यांनी काल्याच्या कीर्तनात केले. तर पुढील वर्ष हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने भगवान बालाजीचा हा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा संकल्प केला.

सात दिवसांपासून या महोत्सवात ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, प्रवचन, हरिपाठ व कीर्तन आदी कार्यक्रम झाले. विवेक महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन झाले. मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी प्रामुख्याने पालकांची असते. मात्र सध्या लहान लहान मुले देखील पुस्तकाऐवजी मोबाइलवर वेळ खर्ची घालताना दिसत आहेत. अनेक मुले मोबाइल गेम व अन्य रील पाहत अभ्यासाकडे दुर्लक्ष करत आहेत, त्यांच्या हातात जर ज्ञानेश्वरी ग्रंथ दिला तर निश्चितच त्यांचेवर सकारात्मक परिणाम दिसून येईल असे ते म्हणाले.

ज्ञानेश्वरी पारायणास जवळपास साठ भाविक बसले होते. त्यांचा सन्मान व्हावा व इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून माजी सरपंच कांतीलाल देसरडा यांच्यावतीने प्रत्येक वाचकास भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande