छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीर अभियान टप्पा-१; जिल्ह्यात ८४ शिबिरांचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 27 फेब्रुवारी (हिं.स.) जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीर अभियान टप्पा-१ अंतर्गत विविध मंडळस्तर व नगरपालिकास्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी कळवले. याअंतर्गत म
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीर अभियान टप्पा-१; जिल्ह्यात ८४ शिबिरांचे आयोजन


छत्रपती संभाजीनगर, 27 फेब्रुवारी (हिं.स.) जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीर अभियान टप्पा-१ अंतर्गत विविध मंडळस्तर व नगरपालिकास्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी कळवले.

याअंतर्गत मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन

. ७ ते १४ मार्च आणि . १० ते १७ एप्रिल, तर नगरपालिकास्तरावर

दि. ८ ते १५ मे दरम्यान करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ९ तालुके, ८४ मंडळ, ५०० सजा आणि १३६९ गावांमध्ये हे अभियान राबवले जाईल, आणि एकूण ८४ शिबिरे घेण्यात येणार आहेत.

उपजिल्हाधिकारी विधाते यांनी सांगितले की, महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी व ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी शासनाने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

शिबिरांमध्ये खालील सेवा उपलब्ध राहणार आहेत:

प्रलंबित फेरफार व अभिलेख दुरुस्ती

७/१२ नोंदी दुरुस्ती

महसूली कायद्यांची जनजागृती व अंमलबजावणी

पाणी व रस्त्यांसंबंधी सेवा

दाखले वाटप

तुकडे बंदी व सामाजिक अर्थसहाय्य योजना लाभ मंजुरी

प्रशासनाने शिबिरांचे यशस्वी आयोजन सुनिश्चित करण्यासाठी ५ मार्चपर्यंत मंडळस्तरावर पूर्वतयारी पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. नागरिकांना या शिबिरांमध्ये सहभाग घेऊन त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande