
छत्रपती संभाजीनगर, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)। मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या राजवटींनी मोठ्या प्रमाणावर आपले साम्राज्य निर्माण केले होते. त्यावेळी मंदिराची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर झाली त्याचबरोबर मूर्तींचाही मोठा विकास मराठवाड्यांमधून झाल्यामुळे मराठवाड्यातूनच मूर्तीचा समृद्ध परंपरा असणारा प्रदेश विकसित झाला असे प्रतिपादन डॉ. माया पाटील यांनी केले आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती विभागामार्फत भारतीय मूर्तीशास्त्र या विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये डॉ.माया पाटील यांनी मराठवाड्यातील समृद्ध असणाऱ्या राजवटींचा उल्लेख करून त्यांनी मंदिर स्थापत्यसाठी व मूर्ती घडवण्यासाठी जे योगदान दिले आहे त्याचा ओळख स्लाईटच्या माध्यमातून करून त्यांनी मूर्तिशास्त्र मूर्तींची उपासना, हिंदू
मूर्तीशास्त्र उदय,विकास व त्याची वाटचाल याविषयी सविस्तर अशी मांडणी त्यांनी केली.त्यामध्ये त्यांनी मूर्तींचे विविध अंग, निर्गुण उपासना, सगुण उपासना, यज्ञ,लक्षण ग्रंथ,मूर्तीची प्राचीनता, वेगवेगळ्या मूर्तींचे आयुधे, वाहन याचा संगोपन माहिती स्लाईडच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. श्रीकांत गणवीर यांनी मूर्तींचे महत्त्व, मूर्ती आणि प्रतिमा यांच्यातील फरक, ग्रंथिक लक्षणे आणि मूर्ती, मूर्तीच्या प्राचीनतेचे महत्व, अंतरविद्याशाखीय मूर्तींचा अभ्यास हे सर्व स्लाईडच्या माध्यमातून दाखवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रा. ओशीन बंब यांनी मूर्ती शास्त्रातील मुद्रा आसन आणि वाहन या विषयावर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी मुद्रा,आसन आणि वाहन हे मूर्तीशास्त्राचे अ ब क ड आहेत असे प्रतिपादन केले.त्याच बरोबर मूर्तींच्या सोबत असणाऱ्या प्रतीकांचा जो गहन अर्थ आहे ते उदाहरणासह स्पष्टीकरण दिले. विद्यार्थ्यांनी जे जे विचारलेले प्रश्न व त्यांच्या शंका, निरासन करण्याचे काम डॉ. माया पाटील, डॉ. श्रीकांत गणवीर व प्रा. ओशिन बंब यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis