
बीड, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट घेऊन बीड जिल्हा व माझ्या मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली.
बीड जिल्हा व संपूर्ण मराठवाडा परिसरात घडलेल्या मल्टिस्टेट बँक घोटाळ्यांमुळे अनेक सर्वसामान्य ठेवीदारांचे कष्टाचे पैसे अडकून पडले आहेत. या ठेवीदारांना न्याय मिळावा व त्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री महोदयांसमोर मांडली. यासंदर्भात लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
स्व. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. त्यांना जिल्हास्तरीय सुरक्षेपेक्षा राज्यस्तरीय सुरक्षा देण्यात यावी, तसेच या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे याला तातडीने अटक करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि न्यायालयीन प्रक्रियेत कठोर शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी ठाम मागणी केली.
तसेच मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis