नाथषष्ठी यात्रोत्सव पूर्वतयारी बैठक भाविकांना स्वच्छता,सुरक्षा व सेवा द्यावी-जिल्हाधिकारी
छत्रपती संभाजीनगर, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। पैठण येथे होऊ घातलेल्या नाथषष्ठी यात्रोत्सवात भाविकांना स्वच्छता, सुरक्षा व सेवा द्यावी. त्यासाठी प्रशासनाने सज्ज असावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. जिल्हाधिकारी स्वामी यांनी पैठण य
नाथषष्ठी यात्रोत्सव पूर्वतयारी बैठक भाविकांना स्वच्छता,सुरक्षा व सेवा द्यावी-जिल्हाधिकारी


छत्रपती संभाजीनगर, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। पैठण येथे होऊ घातलेल्या नाथषष्ठी यात्रोत्सवात भाविकांना स्वच्छता, सुरक्षा व सेवा द्यावी. त्यासाठी प्रशासनाने सज्ज असावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी पैठण येथे नाथषष्ठी यात्रोत्सवाच्या पार्श्वभुमिवर पूर्वतयारी बैठक घेतली. पैठण येथे दि. ५ मार्च रोजी प्रथेनुसार 'तुकाराम बीज' मुहूर्तावर संत एकनाथ षष्ठी यात्रा सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. दि. ९, १० व ११ मार्च दरम्यान षष्ठी, सप्तमी व अष्टमी पर्वावर यात्रा उत्सव साजरा होणार आहे. उत्सवाचे यंदा २२७ वे वर्ष आहे.

उपविभागीय अधिकारी निलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, सहायक गटविकास अधिकारी राजेश कांबळे, जलसंपदा विभागाच्या दगडी धरण उप-अभियंता श्रद्धा निंबाळकर, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत, नायब तहसीलदार कैलास बहुरे व राहुल सुर्यवंशी उपस्थित होते.

'पैठण येथे नाथषष्ठी यात्रा काळात पिण्याच्या पाण्यासाठी किमान २५ टॅंकर्स ३ दिवस अहोरात्र तैनात ठेवावे. स्वच्छता, विद्युत व वाहतूक व्यवस्था अद्यावत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. तसेच पवित्र स्नानासाठी जायकवाडी धरणातून सोडण्यात येणारे पाणी, सार्वजनिक स्वच्छता, विद्युत व्यवस्था, फिरती स्वच्छतागृहे, गावाबाहेर तात्पुरते बसस्थानक व वाहतूक मार्गातील बदल याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande