पीएमआरडीए' हद्दीतील नद्यांचा श्वास जलपर्णीमुळे गुदमरतोय
पुणे, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। :पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील नद्यांमधून जलपर्णी थेट महापालिका हद्दीत येते. त्यामुळे शहरवासीयांना त्रास सहन करावा लागतो; तसेच महापालिकेलाही बाराही महिने सातत्याने जलपर्णी काढावी लागत आहे.
पीएमआरडीए' हद्दीतील नद्यांचा श्वास जलपर्णीमुळे गुदमरतोय


पुणे, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। :पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीतील नद्यांमधून जलपर्णी थेट महापालिका हद्दीत येते. त्यामुळे शहरवासीयांना त्रास सहन करावा लागतो; तसेच महापालिकेलाही बाराही महिने सातत्याने जलपर्णी काढावी लागत आहे. 'पीएमआरडीए' प्रशासनाने जलपर्णी काढण्यासाठी उपाययोजना न केल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून ही समस्या भेडसावत आहे. संयुक्त नदी सुधार योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगून पीएमआरडीए प्रशासन वेळकाढूपणा करत आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.पीएमआरडीए हद्दीतील मावळ तालुक्यात उगम असलेल्या पवना आणि इंद्रायणी नदी पिंपरी-चिंचवड शहरातून जातात. या नद्यांमध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात होते. त्यासाठी महापालिकेतर्फे जलपर्णी नियमितपणे काढली जाते. मात्र, त्यानंतरही जलपर्णी कमी होत नाही. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीत या दोन्ही नदीपात्रांत मोठ्या प्रमाणात जलपर्णी तयार होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande