परभणीच्या युवकाचे अमेरिकेतील शिक्षण संस्थेत अडकलेले 5 लाख पोलिसांच्या मदतीने परत
परभणी, 27 फेब्रुवारी (हिं) अमेरिकेतील एका शिक्षण संस्थेत परभणीतील एका युवकाचे अडकलेले पाच लाख रुपये परभणी सायबर पोलिसांच्या यशस्वी कामगिरीमुळे परत मिळाले. या संदर्भात सविस्तर माहिती अशी, शहरातील काद्राबाद प्लॉट परिसरातील सय्यद आसिम रऊफ य
परभणीच्या युवकाचे अमेरिकेतील शिक्षण संस्थेत अडकलेले 5 लाख  पोलिसांच्या मदतीने परत


परभणी, 27 फेब्रुवारी (हिं) अमेरिकेतील एका शिक्षण संस्थेत परभणीतील एका युवकाचे अडकलेले पाच लाख रुपये परभणी सायबर पोलिसांच्या यशस्वी कामगिरीमुळे परत मिळाले.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी, शहरातील काद्राबाद प्लॉट परिसरातील सय्यद आसिम रऊफ यांनी डिसेंबर 2024 मध्ये अमेरिका (यूएसए) येथील केन्सेस राज्य मेसुरी येथे एम. एस. बिझनेस अनेलेटीक्सचे शिक्षण घेण्यासाठी एडवाय या कन्सलटन्सीचे मार्फत अर्ज केला होता. याकरीता त्यांनी 5 हजार यूएस डॉलर (4 लाख 33 हजार रूपये) ऑनलाईन पध्दतीने पाठविले होते. हे पैसे त्यांनी एडवाय या कन्सलटन्सीचे मार्फत प्राप्त झालेल्या लिंक द्वारे अविला युनिर्वसिटी केन्सेस राज्य मेसुरी यांच्या बँक खात्यावर पाठविले होते ही रक्कम सय्यद आसिम यांच्या खात्यावरुन विद्यापीठाच्या खात्यावर वर्ग झाली होती.दरम्यान ही प्रक्रिया होत असतांना कन्सलटन्सीने कोणतेही काम केले नाही. या संदर्भात त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून त्यांच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती घेतली. कन्सलटन्सी ज्या महाविद्यालयात सय्यद आसिम यांना प्रवेश देण्याच इच्छुक होती त्या महाविद्यालयात त्यांना प्रवेश नको होता. यावरून आसिम यांनी प्रवेशासाठी पाठवलेली रक्कम परत देण्याची मागणी केली असता त्यांनी रिटर्न फ्लाईट तिकीटाची माहिती विचारून त्याचवेळी तुमचे पैसे तुमच्या खात्यात परत देतो असे सांगितले. त्यांनी सर्व प्रक्रिया करूनही त्यांना पैसे परत मिळाले नव्हते. त्यानंतर तीन महिने त्यांनी पाठपुरावा केला. शेवटी एप्रिल 2025 मध्ये सय्यद आसिम यांनी सर्व कागदपत्रांसह या संदर्भात शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलकडे तक्रार केली. ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर सायबर सेलचे पोलीस निरीक्षक बुध्दीराज सुकाळे,पोउपनि आदित्य लाकुळे व सायबर सेलचे पथकाने सबंधीत कन्सलटन्सीकडे वारंवार पाठपुरावा केला या प्रकरणाची माहिती देत दाखल तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात येणार्या कारवाईबद्दल सांगून विद्यार्थ्यांचे पैसे परत करण्यास सांगितले. यावर सुरूवातील कोणतेही उत्तर न देणार्या कन्सलटन्सीने काही दिवसांपूर्वी पैसे परत मिळतील असे आश्वासन दिले. विद्यापीठाकडून या संदर्भात कोणतीही कारवाई न झाल्याने शेवटी कन्सलटन्सीने विद्यार्थ्यांचे पाच हजार डॉलर परत केले आहेत. सायबर सेलकडून तांत्रिक पुराव्याच्या सहाय्याने करण्यात आलेल्या कारवाईने सदर पैसे परत मिळाले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलीस निरीक्षक बुध्दीराज सुकाळे व त्यांचे पथक पोउपनि आदित्य लाकुळे सह अंमलदार बालाजी रेड्डी, पोलीस हेड काँन्स्टेबल गणेश कौटकर, मोहम्मद शारेख, स्वप्नील पोतदार, सय्यद हिना, रजवी मुर्तुजा यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande