शिष्यवृत्ती परीक्षेत परभणीचा ३९.५६ टक्के निकाल
परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ चा निकाल जाहीर झाला असून परभणी जिल्ह्याचा एकूण निकाल ३९.५६ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील शासकीय व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी मोठ्या संख्येने
शिष्यवृत्ती परीक्षेत परभणीचा ३९.५६ टक्के निकाल


परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ चा निकाल जाहीर झाला असून परभणी जिल्ह्याचा एकूण निकाल ३९.५६ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील शासकीय व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी मोठ्या संख्येने नोंदणी केली होती. तब्बल ३२७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून घवघवीत यश मिळाले.

ही परीक्षा आर्थिक दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने घेण्यात येते.

या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना इयत्ता नववीपासून पुढील शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य मिळते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी यंदा उल्लेखनीय सहभाग नोंदविल्याचेही स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्ष परीक्षेला ८४३८ पैकी ८२७८ विद्यार्थी उपस्थित राहिले. तर १६० विद्यार्थी विविध कारणांमुळे अनुपस्थित राहिल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३२७५ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. उर्वरित ५००३ विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरले असून त्यांना अपेक्षित गुणसंख्या गाठता आली नाही. निकालानंतर यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande