
बीड, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।
तपोनिमगाव येथील गोदावरी पात्रातून केनीच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीसांनी सापळा लावला. गोदावरी पात्रात केनीसह ट्रॅक्टर पकडण्यात आले असून तलवाडा पोलीसांनी मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई केली.
वाळू चोरी प्रकरणी तलवाडा पोलीस स्टेशन येथे कलम ३०३, (२) ६२, प्रमाणे चालक मालक गोविंद गोबरे, वय ३५ रा. टाकरवण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पाच लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोदावरी नदीच्या
पात्रात केनीच्या सहाय्याने वाळू उपसा होत असल्याचे तलवाडा पोलिसांनी सापळा रचून गोदावरी पात्रात छापा मारला होता परंतु वाळू माफिया केनी घेऊन पसार झाले परंतु गोदावरी नदीच्या पात्रातून काढलेला वाळुचा माल अंदाजे वीस ते तीस ब्रास तलवाडा पोलिसांनी पंचनामा करून तलाठी यांच्या उपस्थितीत जप्त केला. गोदावरी नदीच्या पात्रात अंदाजे चोवीस तासांच्या आसपास तलवाडा पोलीस ठाण मांडून बसले होते. पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने नदी पात्रात मुद्देमाल ढकलून दिला. दोन दिवसानंतर तलाठी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis